टिओडी मराठी, आसाम दि. 31 जुलै 2021 – हिंसाचारावरून आसाम आणि मिझोराम यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. त्यामुळे आसाम राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. हिमांता बिसवा सरमा हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री असून त्यांना भाजपने त्यांना संधी दिली आहे. मागील महिन्याभरापासून पूर्वेकडील आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांत तणाव वाढला आहे.
मागील अनेक दिवसांपासून आसाम आणि मिझोरम राज्याच्या सीमेवर संघर्ष सुरू आहे. यामुळे दोन्ही राज्यांत तणावाचे वातावरण आहे. आता त्यात भर आणखी पडण्याची शक्यता आहे.
कारण आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. या अगोदर दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांविरोधात समन्स बजावले आहे, असे समजवत आहेत.
26 जुलै रोजी आसाम आणि मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांचे पोलीस आणि सुरक्षादल एकमेकांसमोर येऊन झालेल्या गोळीबार आणि झटापटीत काही पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे.
यावरून मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. झटापट, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची सांगितले जात आहे. याशिवाय 200 अज्ञात पोलिसांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
मिझोरामच्या खासदारांनाही पाठवली नोटीस –
आसाम आणि मिझोरामच्या सीमारेषेवरील कचर भागात काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. यात आसामच्या पाच पोलिसांचा मृत्यू झाला असून पोलिस अधिकारी वैभव निंबाळकर हे जखमी झालेत.
या प्रकरणात शुक्रवारी आसाम प्रशासनाने मिझोरामच्या संबंधित कोलासिब जिल्हा प्रशासनातील सहा अधिकार्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. त्याशिवाय, मिझोरामचे राज्यसभेतील एकमेव खासदार के. वनलेवना यांना देखील नोटीस दिलीय.
सरमा यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांवर गुन्हा दाखल –
एकीकडे आसामने शुक्रवारी मिझोराममधील पोलिस अधिकार्यांना नोटीस पाठवली आहे, तर दुसरीकडे मिझोराम राज्याने आसामचे मुख्यमंत्री यांच्याविरुद्ध गुन्हाच दाखल केला आहे.
ज्या दिवशी गोळीबाराची घटना घडली, त्याच दिवशी आसामचे मुख्यमंत्री आणि इतर सहा अधिकार्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यात सरमा यांच्यासह आयजीपी अनुराग अगरवाल, कचरचे डीआयडी देवज्योती मुखर्जी, कचरचे किर्ती जल्ली, कचरचे डीएफओ सुन्यदेव चौधरी, कचरचे एसपी वैभव निंबाळकर, ढोलाई पोलिस स्थानकाचे ओसी साहब उद्दीन यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.
Assam: Cachar SP & deputy commissioner (DC) yesterday surveyed areas bordering Mizoram for setting up new police posts
"We're setting up new posts to secure our borders. They (Mizoram) have constructed roads & established camps in forests in our territory," said DC Keerthi Jalli pic.twitter.com/5eGiSU1Dsh
— ANI (@ANI) July 30, 2021