टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 13 जून 2021 – परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ईडीने क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजला नोटीस जारी केलीय. या एक्सचेंजने या नियमांचा भंग करून सुमारे 2790 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे, असा त्यांच्यावर आरोप आहे.
चीनी कंपनीच्या मदतीने हा ऑनलाईन बेकायदेशीर व्यवहार झालाय. ही व्यवहाराची रक्कम 2790 कोटी रुपये इतकी आहे. या व्यवहारामध्ये मनीलॉड्रिंगच्या नियमाचे अनेक प्रकारे उल्लंघन झाले आहे, त्यामुळे त्यांच्यावर फेमा अंतर्गत संबधितांना ही नोटीस जारी केली आहे.
या व्यवहारात गुंतलेली वझिर एक्स ही कंपनी कोणत्याही खातेदाराचे कोणतीही कागदपत्रे न तपासता किंवा संबंधीतांचे नागरिकत्वही न तपासता त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करत आहे, असाही त्यांच्यावर आरोप आहे.
भारताने क्रिप्टोकरन्सीला अधिकृतरीत्या मान्यता दिलेली नाही. क्रिप्टोकरन्सीला जगातील बऱ्याच देशांनी मान्यता दिली आहे. याद्वारे व्यवहार केला जातो. मात्र, काही देशात याला मान्यता दिली नसल्यामुळे याद्वारे केलेला व्यवहार कारदेशीर मानला जात नाही.