टिओडी मराठी, दि. 10 जून 2021 – नेपाळ सरकारने बाबा रामदेव यांना मोठा झटका दिलाय. पतंजलीद्वारे निर्मित कोरोनिल किटच्या वितरणावर नेपाळ सरकारने बंदी घातलीय. कोरोनिल औषध कोरोनाच्या संसर्गाविरोधात प्रभावी असल्याचा एकही ठोस पुरावा नाही, असे देखील नेपाळ सरकारने म्हटले आहे.
नेपाळच्या आयुर्वेद आणि पर्यायी औषध विभागाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनिलच्या 1500 किट खरेदी करण्यात योग्य प्रक्रियेचे पालन केले नाही. त्यामुळे कोरोनिलचे वितरण तात्काळ थांबविले आहे.
याअगोदर रामदेवबाबा यांनी हिंदुस्थानात कोरोनिल औषधामुळे कोरोना बरा झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर देशात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर रामदेव बाबा यांनी हे औषध रोगप्रतिकार शक्ती वाढवत आहे, असे म्हटले होते.
भूतान देशानंतर आता कोरोनिलच्या वितरणावर बंदी घातलेला नेपाळ हा दुसरा देश आहे. अलीकडे भूतान औषध नियामक प्राधिकरणाने या औषधाच्या वितरणावर बंदी घातलीय.