अँटी कोरोना औषधं दोन दिवसात उपलब्ध होणार; DRDO अध्यक्षांची माहिती

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 मे 2021 – कोरोना परिस्थितीमध्ये नागरिकांसाठी दिलासादायक बाब समोर आलीय. डीआरडीओने कोरोनावर तयार केलेल्या नव्या औषधांच्या आपात्कालीन वापराला परवानगी दिलीय. 2 डेओक्सी-डी-ग्लुकोज असे या औषधाचं नाव आहे. या औषधांने कोरोना रुग्ण लवकर बरे होत आहेत, असे सांगितलं जातंय.

देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अनेक राज्यात तर ऑक्सिजन पुरवठा होत नसल्यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत.

या औषधांमुळे बाहेरुन ऑक्सिजन कमी प्रमाणात घेतला तरी चालतो. दोन दिवसात हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती समोर आलीय. डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी असा दावा केलाय.

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या औषधाचे 10 हजार डोस बाजारात येण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, सरसकट या औषधांचे सेवन करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध घ्यावं.

या औषधांमुळे ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला 2 ते 3 दिवसात ऑक्सिजन सपोर्टवरुन काढलं तरी चालतं. त्यामुळे लवकरच हे औषध रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल, असेही सतीश रेड्डी यांनी सांगितलं आहे.

आजपर्यंत तीन वेळा या औषधाच्या मानवी चाचण्या केल्याचं डीआरडीओने सांगितलं आहे. देशातील 11 रुग्णालयांत 110 कोरोना रुग्णांवर या औषधांच्या दुसऱ्या फेरीतील चाचण्या मागील वर्षी पार पडल्या आहेत.

Please follow and like us: