TOD Marathi

सचिन पायलट लवकरच BJP मध्ये येतील, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय – रिटा बहुगुणा जोशी, Congress चं नेतृत्व कोण करणार?

टिओडी मराठी, जयपूर, दि. 10 जून 2021 – राजस्थानचे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हि काँग्रेस पक्ष सोडतील आणि लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालंय, असा दावा नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रिटा बहुगुणा जोशी यांनी केलाय.

त्यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या झोप उडाल्या आहेत. राहुल गांधींचे निकटवर्तीय हळूहळू पक्ष सोडून जात आहेत. मग, आता काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. अशावेळी भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे जितिन प्रसाद यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

तर पंजाबमध्ये हि काँग्रेस आमदार चालू सरकार पाडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस उत्तर प्रदेशात अगोदरच अडचणीत असताना आता काँग्रेसच्या समस्यांमध्ये आणखी एक भर पडलीय.

राजस्थानचे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पक्षश्रेष्ठींना अल्टिमेटम दिलाय. जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार व राजकीय नियुक्त्या करण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेण्यास आम्ही स्वतंत्र आहोत, असे सांगितले आहे. म्हणून मागील दोन दिवस राजस्थानात सत्तांतर होण्याच्या चर्चेला वेग आलाय. त्यासह बैठकांचं सत्र चालू झालंय.

या दरम्यान, पंजाब काँग्रेसमध्ये गटबाजी होत आहे. अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वाद सुरू झालाय. पंजाब राज्य हातातून जाण्याअगोदर काँग्रेस हायकमांडने हालचाली सुरू केल्यात.