TOD Marathi

मालाड चाळ दुर्घटना : त्या दोषींनी जबाबदारी स्विकारली पाहिजे -किशोरी पेडणेकर, घटनेला कोण जबाबदार आहे हे पहा

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 जून 2021 – मुंबईमध्ये बुधवारी मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणी भागात एका चार मजली चाळीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या दुर्घटनेवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी असे म्हंटले कि, या दुर्घटनेस्थळी भेट देणार आहे.

मालाड येथे झालेली दुर्घटना दुर्देवी आहे. मालाडमध्ये जे घडलं त्यामागील दोषींनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तिथे कोणाचं प्रशासन आहे हे पाहण्यापेक्षा या घटनेला कोण जबाबदार आहे? हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. जर प्रत्येकाने जबाबदारी घेतली असती तर ही घटना घडली नसतील, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर या घटनास्थळी जाणार आहेत. तसेच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ही घटनास्थळी जाणार आहेत, असेही पेडणेकर यांनी सांगितलं.

न्यू कलेक्टर कंपाऊंटमधील चार इमारतीचा काही भाग कोसळला. यादरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. दुर्देवानं मृतांत 6 लहांना मुलांचा समावेश आहे. या लहानग्यांचे वय 10 वर्षाच्या आत आहे.

 • मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी पुढीलप्रमाणे :
  1. साहिल सर्फराज सय्यद (पु) – 9 वर्ष
  2. अरिफा शेख- 8 वर्ष
  3. अज्ञात (पु) – 40 वर्षे
  4. अज्ञात (पु)- 15 वर्षे
  5. अज्ञात (स्त्री)- 8 वर्षे
  6. अज्ञात (स्त्री) – 3 वर्षे
  7. अज्ञात (स्त्री) – 5 वर्षे
  8. अज्ञात (स्त्री) – 30 वर्षे
  9. अज्ञात (स्त्री) – 50 वर्षे
  10. अज्ञात (पु) – 8 वर्षे
  11. जॉन इराना- 13 वर्ष

 • मालाड इमारत दुर्घटनेतील जखमी पुढीलप्रमाणे :
  मरी कुमारी रंगनाथ- वय वर्ष 30
  धनलक्ष्मी बेबी- वय वर्ष 56 (प्रकृती स्थिर)
  लीम शेख- वय वर्षे 49 (प्रकृती स्थिर )
  रिजवाना सय्यद- वय वर्ष 33(प्रकृती स्थिर)
  सूर्य मनी यादव- वय वर्षे 39 (प्रकृती स्थिर)
  करीम खान वय वर्ष- 30 (प्रकृती स्थिर)
  गुलजार अहमद अन्सारी- वय वर्ष 26 (प्रकृती स्थिर)