टिओडी मराठी, कॅलिफोर्निया, दि. 10 मे 2021 – जगातील नंबर एकचे Google संकेतस्थळ आता ‘गुगल फोटोज अॅप’ हि सर्व्हिस 1 जूनपासून पेड करणार आहे अर्थात ‘या’ सर्व्हिससाठी वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. गुगल कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना सहा महिन्यांपूर्वी याबाबत एक ई-मेल पाठवला होता. या ई-मेलमध्ये गुगलने म्हटलं होतं की, तुम्ही गुगल फोटोज अॅपमध्ये अपलोड केलेले कोणतेही फोटो तुमच्या अकाऊंटसोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट होईल/होतील.
तसेच ई मेलमध्ये गुगल कंपनीने पुढे नमूद केलं आहे की, 1 जून 2021 पासून हाय क्वालिटीमध्ये सेव्ह केलेले सर्व नवे फोटो आणि व्हिडीओज गुगल अकाऊंटसह मिळणाऱ्या 15GB स्टोरेज स्पेस किंवा तुम्ही खरेदी केलेल्या अधिकतम स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट केले जाणार आहे.
कंपनीने गुगलच्या अन्य सर्व्हिसेस जसे की गुगल ड्राईव्ह आणि जीमेलप्रमाणे गुगल फोटोज स्पेस हि काऊंट करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गुगलची मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेली अनलिमिटेड स्टोरेज ऑफर 31 मे 2021 पासून अस्तित्वात राहणार नाही.
जे युजर्स गुगलवर सक्रिय नाहीत, त्यांच्यासाठी हे नवे धोरण आहे. तसेच जे जी-मेल, ड्राईव्हवर स्टोरेज कपॅसिटीची लिमीट क्रॉस करत आहेत. त्यांच्यासाठीही हे नवे धोरण लागू होणार आहे. असे कंपनीने यापूर्वी स्पष्ट केलं आहे.
दर वर्षाला मोजावे लागणार 1,467 रुपये
1 जून 2021 पासून हाय क्वालिटीमधील कोणत्याही फाईल्स तुमच्या गुगल अकाऊंटमध्ये स्टोर करत असाल अन जर तुम्ही 15 जीबीची लिमिट क्रॉस केली असे तर, त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा क्लाऊड स्टोरेजसाठी Google One चं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. किंवा फोटोजमध्ये फ्री स्टोरेजसाठी जुना डेटा डिलीट करावा लागेल. गुगल वनचं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 19.99 डॉलर्स अर्थात 1467 रुपये मोजावे लागणार आहेत. यात तुम्हाला 100 जीबी डेटा मिळणार आहे.