TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 मे 2021 –  सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याचे काही ठिकाणी आढळत असल्यामुळे पुन्हा महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.

सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या दुसरी लाट आल्यामुळे लॉकडाऊन लागू केला आहे. अनेक जिल्ह्यात तेथील रुग्णांची संख्या आणि इतर बाबी लक्षात घेऊन कडक निर्बध लागू केले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन अजून वाढवण्याचे संकेत मिळत आहे. राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहे, असे समजत आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येतील वाढ अद्याप कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे राज्यात 15 मे पर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनमधील नियमावलीमध्ये कुठलीही सूट मिळणार नाही. त्यामुळे राज्यात 30 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.