TOD Marathi

२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं आश्वासन कधीच दिलं नव्हतं, असा दावा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. त्यामुळे ‘मातोश्री’तील बंद खोलीतील वचनाचा हवाला देणारे उद्धव ठाकरे तोंडघशी पडले आहेत. (Promise Uddhav Thackeray Talks) जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतो, तोच मुख्यमंत्री होणार का? एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असा थेट सवाल एकनाथ शिंदेंनी केला. (Eknath Shinde Comments on being CM)

सत्तेत समसमान वाटा शिवसेनेला देण्यात यावा असा फॉर्म्युला लोकसभेपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी यापूर्वी काही वेळा केला होता. भाजपने शब्द फिरवल्याच्या कारणावरुन उद्धव ठाकरेंनी युती तोडली आणि त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीची स्थापना केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे उपमुख्यमंत्रिपद दिले जात असल्याचे ऐकून मला स्वतःलाच आश्चर्य वाटले होते. (Ekanath Shinde was surprised) म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्रिपदावर काम केलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री कसे केले जाऊ शकते? असा प्रश्न मला पडला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची घोषणा केली, तेव्हा ते आनंदी दिसत होते. पण पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री होण्यास सांगितल्यावर ते काहीसे अस्वस्थ झाल्याचे दिसले. त्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चाही केली. त्यावर त्यांनी, पक्षाने वरुन आदेश दिला आहे, तो मान्य करावा लागेल, असे सांगितल्याची आठवणही शिंदेंनी सांगितली.