टिओडी मराठी,, दि. 10 मे 2021 – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावला आहे. तर, काही ठिकाणी संचारबंदी लावली आहे. याचबरोबर, आठवड्याचाही लॉकडाऊन सुरूच ठेवला आहे, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची मागणी अधिक प्रमाणात वाढली मात्र, तुटवडा भासू लागल्याने या जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत, असे समजत आहे.
तर, प्रशासनाने लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करताच नफाखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अचानक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले आहेत. त्यामुळे यात सामान्य ग्राहकांचं जगणं मुश्किल होत आहे.
किरकोळ विक्रेत्यांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या दैनंदिन भाजीपाल्याचे दरही २ दिवसांपासून दुप्पट झाले आहेत. आठवड्याच्या बाजारामध्ये भाजीपाला सामान्यांना परवडेल अशा दरात मिळतोय, म्हणून निर्धारित वेळेत गर्दी होती. त्यामुळे कांदा 20 रुपये किलो वगळता चवळी, गवारच्या शेंगाही 60 रुपये किलोप्रमाणे विकल्या आहेत. काही दिवसांपासून 20 रुपये तर, बटाटे 30 रुपये किलो रुपयांनी घ्यावे लागत आहेत.
अक्षय तृतीया जवळ असल्याने लॉकडाउननंतर गरजेचं सामान बाजारात मिळणार नाही, हे विक्रेत्यांनाही बऱ्यापैकी ठावूक असल्याने आणि ग्राहकांना सणासुदीला काही गोष्टी कमी प्रमाणात का होईना. परंतु घेणे गरजेचं असल्याची बाब विक्रेत्यांनी हेरून दर अव्वाच्यासव्वा वाढविले. तर, गल्लीबोळामध्ये फिरणाऱ्या किरकोळ भाजी विक्रेते देखील नेहमीप्रमाणे भाव कमी करायला तयार नाहीत.
अनेकांनी भाववाढीबाबत भाजीपाला विक्रेत्यांकडे विचारणा केली असता बाजारात माल कमी आला आहे. जेवढा माल आला त्याची मूळ खरेदी नेहमीपेक्षा अधिक भावात करावी लागल्याने हे दर वाढल्याचे सांगितल्या जात होते.
दोन दिवसांपूर्वी वीस किंवा तीस रुपये किलो मिळणारी कैरी आणि टोमॅटोचे दर संचारबंदी, लॉकडाउन सुरू होताच अचानक कसे काय वाढले? की वाढीव नफ्यासाठी ते भाव हेतुपुरस्सर वाढविले, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.