TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 जून 2021 – जागतिक बाजारातून संमिश्र संदेश आल्यानंतर भारतीय बाजारामध्ये सोन्याचे दर घसरले तर चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 48 रुपयांनी कमी होऊन 47,814 रुपये प्रति 10 ग्रॅम झालेत. तर चांदीचा दर 340 रुपयांनी वाढून 70,589 रुपये प्रति किलो झाला आहे.

जागतिक बाजारामध्ये सोन्याचे दर 1,859 डॉलर तर चांदीचे दर 27.77 डॉलर प्रती औंस या पातळीवर स्थिर होते.

याबाबत एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, बुधवारी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्यामुळेच सर्वच बाजारातून संमिश्र संदेश मिळत आहे. त्याचा परिणाम सोने व चांदीच्या दरावर झाला.

याबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमाणी म्हणाले कि, अपेक्षेप्रमाणे आज सोने आणि चांदीच्या दरामध्ये बरेच चढ-उतार झाले आहेत.