TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 10 मे 2021 – सध्याच्या कोरोना काळात दुसरी लाट असतानाही सोनं आणि चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याच्या दरात तेजी आल्याचं समजत आहे.

सोन्याचा जूनचा वायदा 58.00 रुपयांच्या तेजीसह 47,809.00 रुपयांच्या लेवलवरतर, चांदीचा जुलैचा वायदा 720.00 रुपयांच्या तेजीसह 72,149.00 रुपयांवर ट्रेंड करतोय. मात्र, सतत तेजी असतानाही सोन्याची दर आपल्या सर्वोच्च स्तराच्या 9,015 रुपयांनी खाली आले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचं झाल्यास, इथेही सोन्याची किमतीत तेजी पाहायला मिळतेय.

24 कॅरेट सोन्याच्या दरबाबत बोलायचं झाल्यास, आज दिल्लीत याची किंमत 50000 प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. याशिवाय चैन्नईत 49220 रुपये, कोलकाता 49670 आणि मुंबईत 45920 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

सोन्याचे भाव ऑगस्ट 2020 च्या पहिल्या आठवड्यामध्ये आतापर्यंतच्या उच्चांकावर होते. सात ऑगस्टला सोन्याचे भाव 56,200 रुपये प्रति १० ग्रॅम होते. 7 मे 2021 ला म्हणजेच शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे बाजार 47,760 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. या आधारे सोन्याचे दर ऑगस्टमधील उच्चांकाच्या 9,015 रुपये प्रति दहा ग्रॅम कमी आहे.