‘मुंबई सालसा’ (Mumbai Salsa) या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अमृता खानविलकर आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृताने अथक मेहतनतीने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे ही हरहुन्नरी अभिनेत्री फक्त अभिनय आणि नृत्यातच पारंगत आहे.नटखट नखऱ्याची नार ‘चंद्रा’ म्हणून अमृता ओळखली जाते. तिने तिच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस अमृताची लोकप्रियता वाढत चालली आहे. ‘वाजले की बारा’ आणि अशा आणखीही गाण्यांतून आपल्या नृत्याची कमाल दाखवणाऱ्या अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे.
कट्यार काळजात घुसली, चंद्रमुखी, वेल डन बेबी, चोरीचा मामला, आणि डॉ. काशीनाथ घाणेकर, सतरंगी रे, साडे माडे तीन (Chandramukhi, Well Done Baby, Dr. Kashinath Ghanekar, Satrangi Ray, Katyar Kaljat Ghusali) अशी मराठी चित्रपटातंमध्ये अभिनय करून अमृताने वाहव्वा मिळवलीय. तर राजी, मलंग, सत्यमेव जयते अशा हिंदीपटातही तिने काम केलं आहे.अमृता ने मेघना गुलजारचा चित्रपट ‘राजी’मध्येदेखील खूप महत्त्वाची भूमिका होती.
अमृताचा ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील अमृताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. या सिनेमात अमृता चंद्राच्या भूमिकेत होती. त्याचबरोबर अमृताने हर हर महादेव (Har Har Mahadev) या सिनेमामद्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडेंची (Baji Prabhu Deshpande’s wife Sonabai Deshpande) भूमिका साकारली आणि ती अमृताची पहिली ऐतिहासिक भूमिका ठरली.
रवी जाधवच्या (Ravi Jadhav) ‘नटरंग’ (Natrang) या बहुचर्चित सिनेमातील ‘वाजले की बारा’ या गाण्यामुळे अमृता खानविलकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण या गाण्यासाठी अमृता पहिली पसंती नव्हती. या गाण्यासाठी एका वेगळ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. पण काही कारणास्तव तिला हा सिनेमा करणं जमलं नाही . त्यामुळे या गाण्याच्या शूटिंगच्या एक दिवस आधी अमृताला विचारणा झाली. या गाण्यामुळे अमृताला घराघरांत लोकप्रियता मिळाली.
अमृताने टीव्ही विश्वात इंडिया बेस्ट सिने-स्टार की खोजमधून पाऊल ठेवलं होतं. यानंतर तिने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. अमृता तिचा पती हिमांशू सोबत शो नच बलियेमध्ये देखील दिसली होती. ती या शोची विजेतीदेखील बनली होती. अमृताने ‘डान्स इंडिया डान्सचा सीझन ६’ (Season 6 of Dance India Dance) देखील होस्ट केला आहे.