TOD Marathi

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या (Underworld Don Daud Ibrahim)  हस्तकांकडून पंतप्रधान  नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) हत्येचा कट रचण्यात आला , असा मेसेज मुंबई  वाहतूक (Mumbai Traffic)  पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आल्यानं खळबळ माजली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीमच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट  आला. अशी माहिती एका ऑडिओ मेसेज(audio message) द्वारे देण्यात आली आहे आणि हा मेसेज एका अज्ञाताकडून वाहतूक पोलिसांना देण्यात आली. या बाबत सखोल चौकशी पोलिसांतर्फे चालू आहे. पुन्हा एकदा एका मागे एक ऑडिओ क्लिप्स एका अज्ञात इसमाकडून आले. असेही सांगण्यात आले आहे की, दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचलेला आहे तसेच हे हस्तक देशाला बरबाद करण्याचा प्रयत्न देखील चालू आहे. सुत्रांच्या माहितीनुसार २० नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर ऑडिओ क्लिप्स आणि काही मेसेज आले आणि त्यापाठोपाठ २१ तारखेला पुन्हा १२ ऑडिओ क्लिप्स आणि काही मेसेज प्राप्त झाले. आलेल्या मेसेज नंतर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली. पोलिसांची कारवाई इसमाजवळ जाउन थांबली. ही व्यक्ती मेसेज करण्यापूर्वी एका हिऱ्याच्या कंपनीत दागिने डिजाईन करण्याचं काम करायचा त्याच्या मानसिक आजारामुळे नंतर त्याला नोकरी मधून काढण्यात आले. तो सध्या वर्षभरापासून बेरोजगार आहे.