कलर्स मराठीवर प्रदर्शित होणारा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’ (Big Boss) . “ALL IS WELL” म्हणत बिग बॉस मराठीच्या (Big Boss Marathi) चौथ्या पर्वाच्या घराचा दरवाजा उघडला.सोबतच स्पर्धकांच्या नावाचाही पडदा उघडला आणि 16 सदस्यांची बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री झाली.बिग बॉस (Big Boss) मराठीच्या घरामध्ये काल चार गटातील सदस्यांनी बहुमताने त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद (Trishul, Megha, Rohit and Prasad) या सदस्यांना निरुपयोगी सदस्य ठरले. पहिल्याच दिवशी गटातील चारही सदस्यांना कोणता खेळाडू निरुपयोगी आहे? हे ठरवायला सांगितलं. मग काय वाद-विवादाला सुरुवात झाली. अशातच आज घरात पार पडणार आहे सिझनचं पहिलं नॉमिनेशन कार्य.
काल बिग बॉस यांनी सिझनमधील एक मोठे सरप्राईझ देखील सदस्यांना दिले आणि ते म्हणजे “रूम ऑफ फॉर्च्युन” (Room of Fortune). ज्या खोलीमध्ये निरुपयोगी ठरलेल्या सदस्यांना चार दरवाजे दाखविले गेले, त्यातून त्यांना एका दरवाज्याची निवड करायची होती. या सांगकाम्या म्हणून झाहीर झालेल्या चारही सदस्यांना आता घरातील सगळी कामे करावी लागणार आहेत. पण, याचसोबत त्यांना एक पॉवर देखील मिळाली आहे.
आता हे सदस्य या पॉवर चा कसा उपयोग करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे .कोणाला नॉमिनेट करणार असा प्रश्न आता प्रक्षकांना पडला आहे, कारण घरामध्ये पार पडणार हे सिझनचं पहिलं नॉमिनेशन कार्य “आटली बाटली फुटली” ! नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार नॉमिनेशन कार्यादरम्यान अमृता देशमुखने सदस्यांनवर नाराजी व्यक्त केली. तिचे म्हणणे आहे,”बर नाहीये हे दिसते आहे तरी माझ्यावर येऊन बाटल्या फोडत आहात.” तर त्रिशूलने निखिल राजशिर्के यांना जागवायची गरज आहे म्हणून नॉमिनेशनमध्ये टाकले. आता बघूया पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य होणार सेफ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ?