TOD Marathi

हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा सिनेमा घोषणा झाली आणि कधी एकदा याचा ट्रेलर पाहायला मिळतोय असं झालं होतं. मात्र आता ती प्रतीक्षा संपली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला, जेव्हापासून सिनेमातील प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांची नावं त्यांचा लुक समोर आला तेव्हापासून प्रेक्षकांना या सिनेमाचा ट्रेलर पाहण्याची उत्सुकता लागली होती.

विशेष म्हणजे अनेक मराठमोळ्या अभिनेत्री पहिल्यांदाच यानिमित्तानं ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहेत. आता मात्र अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा म्हणजेच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची वीर गाथा सांगणाऱ्या हर हर महादेव या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

सिनेमातील सगळ्या कलाकारांचे लुक पाहून चित्रपटाचा ट्रेलर नेमका कसा असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. अभिनेता शरद केळकरला बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर झाले होते. अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित (Trailer Launch) केला आहे. ‘स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भितींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड!’सादर करत आहोत स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांच्या गाथेची झलक….येतोय ‘हर हर महादेव’ 25 ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांमधून आपल्या भेटीला.’ असं कॅप्शन देत सुबोधने ट्रेलर शेअर केला आहे.

‘हर हर महादेव’ या सिनेमात शरद केळकर (Sharad Kelkar) बाजीप्रभूंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), अभिनेत्री सायली संजीव देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर हार्दिक जोशी आणि शरद पोंक्षे हे अभिनेते देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. हर हर महादेव हा सिनेमा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच येत्या 25 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशात प्रदर्शित होणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा सिनेमा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.