TOD Marathi

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या आपल्या व्यावसायिक आयुष्यात प्रचंड व्यग्र आहे.

नुकतंच ती चंद्रमुखीमध्ये (Chandramukhi )झळकली होती. त्यांनंतर ती ‘झलक दिखला जा’ या हिंदी रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे.


आता अभिनेत्री बहुचर्चित ‘हर हर महादेव’ या चित्रपटात झळकणार आहे.

‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटात अमृता खानविलकर शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे (Sonabai Deshpande) यांची भूमिका साकारत आहे.

अमृता खानविलकरने काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील आपला दमदार लुक शेअर केला होता. आणि तो लुक ही चांगलाच व्हायरल होत आहे.

अमृता सध्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

नुकतच अमृताने ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला हजेरी लावली.आणि त्या इव्हेंटचे साडी मधले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले


हे फोटो अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

फोटोमध्ये अमृताने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे तर त्यावरती कॉन्ट्रॅक्ट असं ब्लाउज घातला आहे.

अमृताने या साडीमध्ये नेहमीप्रमाणे दिलखेच अशा पोज दिल्या आहेत.