TOD Marathi

मराठी मनोरंजन सृष्टीतील एक गोड कपल म्हणजे अभिनेता म्हणजे प्रसाद ओक (Prasad Oak). प्रसाद सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. प्रसादसोबत त्याची बायको मंजिरी (Manjiri) सुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मराठीतील सर्वात लोकप्रिय कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. दोघांचे जोडीने कपल गोल्स देतानाचे विडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच या दोघांचा एक नवा कोरा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये मंजिरी एक छान वेस्टर्न लुक तयार करण्याच्या तयारीत असते. यामध्ये तिनं शॉर्ट वनपीस घेतल्याचं दिसतंय मात्र प्रसाद टिपूच्या वेस्टर्न कपड्यांऐवजी एक छान अशी साडी ठेवतो. आणि नंतर मंजिरी वेस्टर्न कपड्यांऐवजी साडी नेसून येते. स्वतःला साडीत पाहून ती थक्क होते. मग तिला कळतं की हे सारं प्रसादनं केलंय. दोघांचा हा भन्नाट रील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शिवाय यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)


‘आरारारारारा…. काय तो खतरनाक लूक, खूप सुंदर मॅम, स्माईल इमोजी’, अशा अनेक कमेंट या व्हिडओखाली येत आहेत. दोघांचा हा कॉमेडी अंदाज चाहत्यांचा पुरता पसंतीस उतरस आहे. प्रसाद आणि मंजिरी कायमच हटके आणि भन्नाट व्हिडीओने प्रेक्षकांचं लक्ष वेधत असतात. यावेळीही त्यांनी आपल्या नव्या व्हिडीओनं सोशल मीडियावर सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.