भोपाळ: देशात नुकतेच नामीबिया देशातुन चित्ते आणले गेले आहेत. ही संख्या वाढवण्यासाठीही केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून आठ चित्ते मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. त्यात तीन मादी तर पाच नर चित्ते (Cheetah) आहेत. यातील आशा नावाची मादी चित्ता गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक वन अधिकारी या मादी चित्त्याची मॉनिटरिंग करत आहेत. दरम्यान, या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. असं असलं तरी चित्त्यांच्या परिसरात जाण्यास मात्र पर्यटकांना परवानगी देण्यात येणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांपैकी तीन नर चित्ते आहेत, त्यांचे वय 2 ते 5 वर्ष आहे. गेल्या 70 वर्षात भारतातून चित्ते पूर्णतः लुप्त झाले आहेत. त्यामुळे भारताने नामिबियाशी करार करून तिथुन चित्ते भारतात आणले.
ज्या दिवशी या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येत होतं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी उपस्थित होते. या चित्त्यांना विशेष विमानाने मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलं.