TOD Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  वाढदिवशी (Narendra Modi’s birthday) मध्य प्रदेशच्या कुूनो नॅशनल पार्क (Kuno National Park) मध्ये नामिबियातून (Namibia) 8 चित्ते भारतात आले आहेत.

 

या 8 चित्त्यांना विशेष बोईन विमानाद्वारे ग्वालियर एअरपोर्टवर (Gwalior Airport) आणण्यात आलं.

त्यानंतर चिनूक हेलिकॉप्टरने त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलं आणि या चित्त्यांना आता क्वारंटाईनमध्ये सोडण्यात आलं आहे.

 

नामिबियातून आलेल्या एकूण 8 चित्त्यांमध्ये मध्ये 5 मादी आणि 3 नर जिथे आहेत.

 

साऊथ आफ्रिकेतील (South Africa) नामेबियामध्ये जगातील सर्वाधिक चित्ते आहेत 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने चित्ते भारतात आणण्याचे परवानगी दिली होती त्यावर दोन वर्ष त्यांना भारतात कसं आणलं जाईल यावर अभ्यास करून आता 2022 मध्ये हे चित्ते भारतात आले आहेत.

 

 

1948 मध्ये भारतात शेवटच्या चित्त्याला मारण्यात आलं होतं, त्यानंतर 1952 मध्ये भारत सरकारने भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे

अधिकृतरित्या जाहीर केलं होतं.