टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 मे 2021 – देशभरामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. या पार्श्वूमीवर कोरोना काळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना सरकारी नोकऱ्यांत प्राधान्य दिलं जाणार आहे, असं सरकारनं म्हटलंय. केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेऊन कोरोना काळात ड्यूटी करणाऱ्या डॉक्टरांना दिलासा दिला आहे.
केंद्र सरकारने एमबीबीएसनंतर पीजीसाठी होणारी नीट प्रवेश प्रक्रिया अर्थात NEET-PG किमान चार महिन्यांसाठी स्थगित केलीय.
पीएमओच्या हवाल्यानुसार मिळालेल्या माहितीवरून एका वृत्तसंस्थेने सांगितले कि, “शंभर दिवस कोव्हिडसाठीची ड्यूटी पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना आगामी सरकारी भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे.
यामुळे मोठ्या संख्येने अनुभवी डॉक्टर कोव्हिड सेंटर्स व हॉस्पिटल्समध्ये सक्षमपणे ड्यूटी करतील, असाही विश्वास व्यक्त केला जातोय. इंटर्न डॉक्टरांसाठीही एक महत्त्वाची सूचना केली आहे. आपल्या विभागप्रमुखांच्या देखरेखीअंतर्गत इंटर्न डॉक्टरांना कोव्हिड वॉर्डमध्ये ड्यूटी दिली जाणार आहे.
बीएससी व जीएनएम पात्रताधारक नर्स यांना देखील आता कोव्हिड वॉर्डमध्ये पूर्णवेळ ड्यूटी करता येणार आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखी अंतर्गत ड्यूटी करू शकतील, असंही स्पष्ट केलं आहे.