संदीप बालवडकर यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून केले रुग्णवाहिकेचे लोकार्पण

टिओडी मराठी, पुणे, दि. 1 मे 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कार्यकर्त्यांना मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेरी- बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी येथील संदीप बालवडकर यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि संदीप बालवडकर युवा मंचच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.

हे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. आजपर्यंत नेहमी संदीप बालवडकर यांनी समाजहिताची अनेक कामे हाती घेतली आहेत, त्यातील एक हे काम आहे.

याप्रसंगी संदीप बालवडकर यांना वाढदिवसाच्या सदिच्छा देण्यासाठी आणि लोकार्पण सोहळ्यास खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे-पाटील, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, प्रदीप देशमुख, नितीन कदम, किशोर कांबळे, शैलेंद्र कदम, स्वप्नील बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Please follow and like us: