टिओडी मराठी, पुणे, दि. 20 ऑगस्ट 2021 – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना प्रतिबंधक आठवड्याला नियमित लसीचा पुरवठा होत आहे. गुरूवारी ग्रामीणसाठी सुमारे 83 हजार 760 डोस आलेत. त्यानुसार केंद्रनिहाय त्याचे वितरण केले आहे. त्यात कोविशील्ड लसीचे 76 हजार तर, कोवॅक्सिनच्या 7 हजार 760 डोसचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे आठशेहून अधिक लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. मिळणाऱ्या लसीच्या प्रमाणानुसार केंद्रांना त्याचे वितरण केले जात आहे. गुरूवारी कोविशील्डचे 76 हजार लसीचे डोस वितरित केले आहे.
त्यात सर्वाधिक इंदापूर तालुक्याला सुमारे 9 हजार 300 डोस, खेडला 8 हजार 800 तसेच इंदापूर, जुन्नर, मावळ यासह अन्य तालुक्यांना लसीचे वाटप केले आहे. या दरम्यान, कोवॅक्सिनचे 7 हजार 760 डोस आले आहेत.
तर दुसऱ्या डोससाठी ही लस देणार आहे. त्यात औंध जिल्हा रूग्णालयात 1 हजार 400 लसीचे डोस आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाला वेग येणार आहे, अशी शक्यता आहे..