TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 8 जुलै 2021 – जम्मू काश्मीरमध्ये २४ तासांत जवानांनी ५ दहशतवाद्यांना ठार केलं आहे. सुरक्षा जवानांनी कुलगाम आणि पुलवामा येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

सुरक्षा जवानांना कुलगाम जिल्ह्याकील झोदार परिसरात काही दहशतवादी लपले आहेत, अशी माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसर सील करून सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.

सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला आणि चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झालेत.

तर, दुसरीकडे पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि हंडवारा येथे एक दहशतावादी ठार केला आहे. हिजबूलचा टॉप दहशतवादी मेहरजुद्दीन उर्फ उबैद हंडवारामधील चकमकीत ठार झाला आहे. आतापर्यंत २४ तासात एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.