TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 8 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र आरोग्य विभागात सुमारे 3466 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. गट-ड च्या जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी विविध केंद्रावर लेखी परीक्षा होणार आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. महाराष्ट्रातील राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 22 ऑगस्ट 2021 आहे.

पद भरती गट-ड – एकूण जागा 3466

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
विविध पदासाठी शासनाने घोषित केलेली अहर्ता आवश्यक.

नोकरीचे ठिकाण :
ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा,गोंदिया, चंद्रपूर, पुणे.

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

या पदभरतीसाठी https://www.arogyabharti2021.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.