TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 8 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यात कोरोनाची लाट ओसरत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल केले आहेत. पण, पुण्यात निर्बंध कायम ठेवल्याने वाद निर्माण झाला होता. अखेर पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेऊन निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली.

पुण्यात आता दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर हॉटेल आणि रेस्टारंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. पुण्यातील मॉल सुद्धा सुरू केले असून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

मात्र, लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना परवानगी दिली जाणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच शनिवारी आणि रविवारी दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे मास्क वापरणे बंधनकारक आहे.

दुकाने आणि मॉलमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक असणार आहे. जर पॉझिटिव्ह रेट जर 7 टक्क्यांच्या पुढे गेला तर पुन्हा एकदा निर्बंध लावले जातील, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे.

  • पुण्यात निर्बंध शिथिल :
    – सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार.
    – हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार.
    – शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी.
    – मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार.
    – लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार प्रवेश.