टिओडी मराठी, पुणे, दि. 31 मे 2021 – शहरासह ग्रामीण भागात करोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. पण, तरीही काही नागरिक करोनाविषयक आवश्यक ती खबरदारी घेताना दिसत नाहीत. मागील वर्षभरात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह आणि ग्रामीण भागात करोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मास्क न वापरता फिरणाऱ्या 7 लाख 43 हजार नागरिकांकडून 32 कोटी 22 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
करोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांकडून तसेच कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.
या नियमांची कडक अंमलबजावणी सुरूय. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांमुळे करोना संसर्गजन्य आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही.
दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलीस, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत, नगरपालिका यांना दिले आहेत.