टिओडी मराठी, पुणे, दि. 5 सप्टेंबर 2021 – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जहरी टीका केलीय. पाप केलं की कोरोना होतो आणि पाप भाजपने केलं, त्यामुळेच त्यांची भाजपची सत्ता गेली, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. पुण्यातील खेड येथीस शिवसेना मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
भाजपने युतीतही गद्दारी केलीय. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर गेलो. तुम्ही आमचे उमेदवार पाडत राहिलात, आम्ही तुमचं सरकार पाडलं, असे ही संजय राऊत म्हणाले. यावेळी बोलताना राऊत यांनी उपस्थितांना मास्क लावण्याचे आवाहन केलं.
तुम्ही मास्क लावलं नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपली चंपी करतील. अगोदर माझी चंपी करतील मग, तुम्हाला फटकारतील, अ ही राऊत म्हणाले. त्यासोबतच राऊत यांनी आपल्या भाषणात आपला मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला डिवचलं.
या दरम्यान,ज्यामध्ये तीन पक्षांचे सरकार असलं तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचं सरकार असतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आपलेच आहेत. मात्र, शिवसेना सगळ्यांच्या वर आहे, असे राऊत म्हणाले.