TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 3 जून 2021 – सायकल चालवून पाय दुखतात म्हणून मोटरसायकल घेतात. आणि मोटरसायकल चालवून पाठ दुखते म्हणून चारचाकी घेतात. आणि चारचाकी चालवून वजन वाढल्याने जिममध्ये जाऊन पुन्हा सायकल चालवतात, अशी उदाहरणं दिली जातात. याचा अर्थ निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवा अन आरोग्य जपा असंच म्हणायला हवं. आज जागतिक सायकल दिवस यानिमित्त जाणून घेऊ, सायकल चालविण्याचे फायदे.

सायकल चालविणे ही केवळ मजेदार एक्टिव्हीटज नव्हे तर आपल्या स्नायूंना टोन करणं, हाडे मजबूत करणे आणि वजन कमी करणे यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. आपले वजन कमी करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी याबाबत काळजी घ्यावी लागेल.

वेटलॉससाठी लाँग राईड्स करणे उत्तम आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी जास्तवेळ सायकल चालवल्यास चांगले ठरेल. कमी गर्दी असलेल्या ठिकाणी राईडला जाण्याचा प्रयत्न करावा. सायकलिंग दररोज केल्याने पोटावरची चरबी सहज कमी होण्यासाठी मदत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय तणाव कमी करण्यासाठी सायकल चालवणं आरोग्यासाठी चांगलं आहे.

जाणून घ्या, इनडोअर सायकलिंगचे फायदे

१) आजकाल अनेक जिममध्ये अशा सायकली असतात. ज्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल तुम्ही चालवू शकता.

२) कोणत्याही वयोगटातील कोणीही सायकल चालवू शकता. हळूहळू सुरुवात करून त्याचा वेळ आणि तीव्रता वाढवू शकतो.

३) कोरोनामुळे रस्त्यावर चालवण्याच्या सायकलींना तरी काही प्रमाणात मर्यादा असतात, पण या सायकलिंगला नाही. त्यामुळे तुम्ही आरामात घरच्याघरी सायकल्स चालवू शकता.

४) कोणत्याही वेळात तुम्ही सहजपणे ती चालवू शकता. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यात देखील. घरात अशी सायकल असल्यास सगळे सदस्य या सायकलच्या वापर करून आरोग्य चांगलं ठेवू शकतात.