TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 7 सप्टेंबर 2021 – मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. पुणे, मुंबई आणि इतर मोठ्या शहरामध्ये कोरोना आकडेवारी वाढत आहे. त्यात आता श्रावणातील गणेशोत्स्व आणि इतर सणांमुळे गर्दी होणार आहे, अशी शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यानंतर वाढता कोरोना आणि सणासुदीमुळे आता राज्यात पुन्हा निर्बंध लावले जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

त्यावर आता मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं आहे. वडेट्टीवार म्हटले की, मुंबई आणि पुणे सारख्या शहरामध्ये पुन्हा रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ऐन सणासुदीत ही रूग्णवाढ पाहता लोकांनी ही गर्दी टाळली पाहिजे.

महाराष्ट्र राज्यात काही नवीन नियम आणि निर्बंध लावले जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक दोन दिवसात तज्ज्ञांची चर्चा करून निर्णय घेतील, असा सूचक संदेश देखील विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. गणेशोत्सवाच्या काळात निर्बंध लावले जाणार आहेत, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केल्यानं आता मु्ख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्राने महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यामध्ये नाईट कफ्यु लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनांवर आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.