नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये महाविकासआघाडी सरकारच्या प्रभागरचनवेर टीकास्त्रांचा प्रहार केला आहे. यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन तीन बोट का दाबायची. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, महापालिकेला प्रभाग का? यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबू, पण आता लोकांनी विरोध करावा, कोर्टात जावं, निवडणूक आयोगाकडे जावं. कुठलाही नगरसेवक काम करु देत नाही, प्रभागामध्ये कामं होत नाही. उद्या लोकांनी ठरवलं नगरसेवकाला भेटायचं आहे, तर कोणत्या नगरसेवकाला भेटायचं? यांनी निवडणुकीची थट्टा करुन टाकली आहे. गृहित धरणं सुरु आहे त्याविरोधात लोकांनी कोर्टात जायला हव, असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.
किती वैयक्तिक पातळीवर जायचे कळत नाही, साप काय बेडूक काय, सगळा बेडूक करुन टाकलाय कानफाटात काय मारु वगैरे, कुठल्या पदांवर आपण बसलोय हे ध्यानात ठेवायला हवं. हे सगळेच जण एकमेकांना फोन करुन सांगतात की काय कळत नाही, मूळ प्रश्नांवर दुर्लक्ष करण्यासाठीच हे सुरु आहे की काय, टीव्ही, न्यूज चॅनलवरही तेच, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.