TOD Marathi

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना महिला सुरक्षेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्यात दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नुकताच साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला होता.

नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी मध्यमानशी संवाद साधत असताना राज्यात वाढत्या महिलांच्या अत्याचारांवर भाष्य केलं आहे. या वेळेस ते म्हणाले, तालिबान्यांनी आणलेला शरियतसारखा कायदा भारतात आणा, मग महिलांवरील अत्याचार थांबतील, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

साकीनाका,पुणे अमरावती, औरंगाबाद अशी ठिकाणच्या घटना ताज्या असतानाही अशा धक्कादायक घटना दररोज समोर येत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे कधीही निघाले नव्हते, अशी टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथील दौऱ्या दरम्यान त्यांनी मत मांडल आहे.