TOD Marathi

दशकभरात निमलष्करी दलांतील 81 हजार जवानांची Voluntary Retirement ; Union Home Ministry ने जाहीर केली आकडेवारी

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 जुलै 2021 – निमलष्करी दलांमधील 81 हजार जवानांनी गेल्या दशकभरात (2011 ते 2020) स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्या कालावधीमध्ये सुमारे 16 हजार जवानांनी सेवेचा राजीनामा दिलाय. केंद्रीय गृह मंत्रालयाने संबंधित आकडेवारी जारी केलीय.

ती केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व आसाम रायफल्स या 6 निमलष्करी दलांशी निगडीत आहे.

त्या दलांमधील सर्वांधिक 11 हजार 728 जवानांनी 2017 या वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलीय. तर, 2013 मध्ये सर्वांधिक 2 हजार 332 जवानांनी राजीनामा दिलाय. गेल्या दशकभरात स्वेच्छानिवृत्तीचे पाऊल उचलणाऱ्यांमध्ये बीएसएफ जवानांचे प्रमाण (36 हजार 768) सर्वांधिक ठरले.

त्याखालोखाल सीआरपीएफमधील 26 हजार 164 जवानांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग अवलंबला. गेल्या दहा वर्षांत सीआयएसएफच्या सर्वांधिक 5 हजार 848 जवानांनी राजीनामा दिलाय.

त्याखालोखाल बीएसएफ (3 हजार 837) व सीआरपीएफचा (3 हजार 366) क्रमांक लागला. संबंधित निमलष्करी दलांत मिळून सुमारे 10 लाख जवान आहेत.

अंतर्गत सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सीआरपीएफवर सोपवली जाते. दहशतवाद व नक्षलवादविरोधी मोहिमांमध्येही त्या दलाचा सहभाग असतो. बीएसएफचे जवान पाकिस्तान व बांगलादेशलगतच्या सीमांच्या रक्षणसाठी सज्ज असतात.

देशातील महत्वाच्या आस्थापनांची सुरक्षाव्यवस्था सीआयएसएफकडे सोपविली आहे. आयटीबीपीचे जवान भारत-चीन सीमेवर तर, एसएसबीचे जवान नेपाळ, भूतान सीमांवर तैनात आहेत.

आसाम रायफल्सचे जवान भारत-म्यानमार सीमेचे रक्षण करत असतात. ईशान्य विभागातील बंडखोरांच्या कारवाया मोडून काढण्याची जबाबदारी त्या दलावर आहे.

हि आहेत नेमकी कारणे काय? :
जवानांनी स्वेच्छानिवृत्तीचा किंवा राजीनाम्याचा निर्णय घेण्यामागची नेमकी कारणे शोधण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ठोस स्वरूपाचा अभ्यास केलेला नाही.

मात्र, संबंधित दलांच्या कारणमीमांसेनुसार व्यक्तिगत व कौटूंबिक कारणे, प्रकृतीविषयक समस्या आणि कारकिर्दीशी निगडीत चांगल्या संधी त्या निर्णयामागे आहे, असे मानले जाते.