TOD Marathi

मुंबई: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना सोमय्या दिसून येत असून अनेक मंत्री सोमय्या यांच्यामुळे अडचणीत आले आहेत.

सोमय्या यांच्या आरोपांची मालिका सुरुच असून यावेळी कुणी राजकीय नेता नाही तर मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांनी लक्ष्य केलं आहे. विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात त्यांच्यावर मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईबाबत बोलाताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करता येत नाही हे लक्षात घ्यावं. विश्वास नांगरे पाटलांनी मला तर बेकायदेशीर रित्या मला घरात कोंडून ठेवलं. तेच सूचना देत होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.