मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना विराट कोहली यानं धक्कादायक खुलासा केला आहे. प्रत्येक चेंडूवर मी धावा केल्या पाहिजेत आणि सामन्याच्या प्रत्येक क्षणी मी सर्वस्व पणाला लावून खेळले पाहिजे अशी माझी भावना असते. माझ्यात जोश, धमक आहे असे म्हणत मी स्वतःचीच खोटी समजूत काढत होतो. मात्र, दुसरीकडे शरीर थकले होते. विश्रांती घे, असा आवाज आतून येत होता, असं धक्कादायक विधान कोहलीनं केलं आहे. (Virat Kohali Interview )
एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कोहली म्हणाला की, मानसिकदृष्ट्या खचलो होतो आणि आज मी हे कोणत्याही संकोचाशिवाय मान्य करतो. गेल्या दहा वर्षांत असे पहिल्यांदाच झाले की, मी एक महिनाभर बॅटला हातही लावला नाही. त्या मानसिक दुर्बलतेच्या काळात मी उसने अवसानही दाखवले.
तसेच मनोधैर्यावर परिणाम होणे, मानसिकदृष्ट्या खचणे हे अगदी सामान्य आहे. मात्र, अशा गोष्टींबाबत आपण खुलेपणाने बोलत नाही. आपल्याला भीती वाटत असते. समाजापुढे मानसिक दुर्बल दिसणे आपल्याला आवडत नाही. मात्र, ही भावना लपविण्यासाठी उसने अवसान आणणे त्यापेक्षाही घातक आहे.
दरम्यान प्रत्येक चेंडूवर मी धावा केल्या पाहिजेत आणि सामन्याच्या प्रत्येक क्षणी मी सर्वस्व पणाला लावून खेळले पाहिजे अशी माझी भावना असते, असंही त्यानं भारत पाकिस्तान सामन्याच्या पुर्वसंधेला स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विराट पुन्हा एकदा जोमानं क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. या चुरशीच्या सामन्यात आता नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.