टिओडी मराठी, दि. 11 जून 2021 – मागील काही वर्षामध्ये मोबाईल बँकिंगला, कॅशलेस व्यवहारांना गती मिळाली असली तरी रोख व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे एटीएमचा वापर आज देखील सुरू आहे. मात्र, आता एटीएममधून पैसे काढणे बँकेच्या ग्राहकांना महाग पडणार आहे. एटीएमचा मोफत वापर करण्याची मर्यादा ओलांडल्यावर लागणारा कस्टमर चार्ज व एटीएम चार्जचे पैसे वाढविलेत. ही वाढ 1 ऑगस्ट, 2021 पासून लागू होणार आहे.
आयआरबीने एटीएमच्या वापरावर चार्जेस वाढविले आहेत. यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेशिवाय अन्य बँकेतून पैसे काढतात. तेव्हा मोफत वापराच्या मर्यादेपेक्षा अधिक वापर केल्यास अधिक पैसे कापले जाऊ शकतात.
कस्टमर चार्जची रक्कम प्रति ट्रांझॅक्शन 20 पासून 21 रुपये केलेत. अर्थात ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून एटीएमच्या ‘ज्यादा’ वापरानंतर अधिकची रक्कम मोजावी लागेल. हे चार्ज नव्या रीसाइक्लर मशीनसाठी हि लागू होतील.
तर, आरबीआयने इंटरचेंज फी 15 वरून वाढवून 17 रुपये एवढी केलीय. तर, बिगरआर्थिक ट्रांझॅक्शन फी 5 वरून 6 रुपये केली आहे. बिगरआर्थिक ट्रांझॅक्शनमध्ये बँलेन्स तपासणे यासारख्या सोयी येतात. एटीएमच्या वापरासाठी मेट्रो शहरात मोफत मर्यादा ३ आहे तर, अन्य भागामध्ये पाच आहे.