TOD Marathi

लॉकडाऊनमुळे वैतागला?; केवळ 72 रूपयांत ‘या’ ठिकाणी राहायची सोय, पर्यटनाचा घ्या आनंद

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 10 जून 2021 – कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. परिणामी जगातील बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन हटवलं आहे. लॉकडाऊननंतर आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवले की कुठेतरी फिरायला जायचं असेल. तर हे ठिकाण तुमच्यासाठी अतिशय निसर्गरम्य आहे. थायलँडमध्ये तुम्हाला केवळ 72 रूपयांमध्ये एका रात्रीसाठी रूम बुक करता येणार आहे.

फुकेत किंवा थायलँड हे निसर्गरम्य रोमँटिक ठिकाणं आहेत. भारतीय पर्यटकांची या ठिकाणांना पसंती असते. वेगवेगळ्या देशातले लग्न झालेली जोडपे त्यांच्या हनीमूनसाठीही इथे येतात.

इथले हॉटेल्स, बीच व एडव्हेंचर गेम याची सगळ्यांना ओढ असते. जर तुम्हालाही फुकेतला जायचं असेल तर लसीकरण गरजेचं आहे. कारण, जुलैपासून लस घेतलेल्या पर्यटकांना फुकेत खुलं होणार आहे.

तर, थायलॅंडमध्ये ‘वन नाईट वन डॉलर’ नावाचं कॅम्पेन सुरू केलं आहे. तिथल्या पर्यटन परिषदेने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे कॅम्पेन सुरू केलंय. या कॅम्पेनच्या माध्यमातून हॉटेलमध्ये राहण्याची सोय 1 डॉलरमध्ये म्हणजे 72 रुपयांमध्ये होणार आहे. पर्यटकांना 1 रात्रीसाठी 1 डॉलर मध्ये इथे रूम बुक करता येणार आहे.

या दरम्यान, हॉटेल मधल्या याच खोलीसाठी याअगोदर थायलँडच्या चलनात 1000 ते 3000 म्हणजेच 2500 ते 7000 रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागत होती. थायलँडमध्ये दिलेल्या ऑफरने पर्यटकांच्या संख्येत वाढ झालीय तर, बँकॉक आणि समुईमध्येही ही ऑफर सुरू करणार आहे.

फुकेतमध्ये टप्प्याटप्प्याने पर्यटकांना येण्याची परवानगी देणार आहे, असे थायलँडचे पर्यटन प्राधिकरणाचे गव्हर्नर युथासाक सुपासोर्न यांनी यासंदर्भात माहिती दिलीय.