TOD Marathi

शिवसेनेतील (Shivsena) संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. धनुष्यबाण चिन्ह (Dhanusahban Symbol) कुणाला मिळणार? यावर आता दोन्ही गटांच्या वतीने दावा करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला उद्या दुपारपर्यंत कागदपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी दोन वाजता पर्यंत मुदत ठाकरे गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी दिली आहे. मात्र, आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे कोणी काय काय कागदपत्र किंवा माहिती सादर केलेली आहेत हे बघुया,

● उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) 14 आमदार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार आहेत.

● उद्धव ठाकरेंकडे 6 खासदार आहेत तर एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) 12 खासदार आहेत.

● पदाधिकारी किती आहेत, हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या सांगतील तर एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) 144 पदाधिकारी आहेत.

● राज्य प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या सांगतील तर एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 राज्य प्रमुख आहेत.

● शपथ पत्र हे उद्धव ठाकरे उद्या सांगतील तर एकनाथ शिंदे 7 लाख शपथपत्र आहेत असं म्हणतात.

ही माहिती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे दिले आहे. यापैकी उद्धव ठाकरे यांनी माहिती देण्यासाठी आणखी मुदत निवडणूक आयोगाकडे मागितली होती. जवळपास पंधरा दिवसांची मुदत मागण्यात आली होती मात्र निवडणूक आयोगाने उद्या दुपारी दोन वाजता पर्यंतची मुदत दिली आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या वतीने मात्र ठाकरे गट वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्या यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कुणाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार की धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.