TOD Marathi

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) आई-वडिलांना शिव्या घाला चालेल मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना वाईट बोललेला सहन करणार नाही, असं वक्तव्य एका कार्यक्रमात होतो हे बोलत असतानाच कोल्हापूरच्या लोकांना आई वरून शिव्या देण्याची सवयच आहे असेही म्हटलं होतं. त्यावरून आता आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर चांगलाच निशाणा साधला आहे. (NCP MLA Rohit Pawar on Chandrakant Patil)

रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटलंय की, “आदरणीय चंद्रकांतदादा, आपल्या नेत्यांचा आदर सर्वांनाच आहे. परंतु, आपल्या नेत्यांचे गुणगान गातांना कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. यामुळे सध्या खालवणाऱ्या राजकीय पातळीला काही स्तर आहे की नाही, असा प्रश्न मला पडतो.”

चंद्रकांत पाटलांच्या त्या विधानावर राजकीय वर्तुळात बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी आपल्या आई-वडिलांपेक्षा अन्य कोण श्रेष्ठ असू शकतो अशाही प्रतिक्रिया इंटरनेटवर व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पुणे भाजपच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते.