TOD Marathi

नाशिक:
औरंगाबाद रोडवर शनिवारी पहाटे एका डंपर आणि खाजगी बसचा अपघात झाला. (Accident took place in Nashik) या अपघातात बसने पेट घेतला आणि 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघात ग्रस्त बसला क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलवण्यात आले. यावेळी लहान बाळासह दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा 11 वर गेला आहे.

प्राप्त माहितीनुसार यवतमाळच्या पुसद येथून मुंबईच्या (A private bus was travelling to Mumbai from Yawatmal) दिशेने चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवासी निघाले होते. ही बस नाशिकच्या मिरची हॉटेल जवळ आली असताना बसचा भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणारी लक्झरी बस आणि औरंगाबादच्या दिशेने जाणारा डंपर यांच्यात हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर बसला आग लागली आणि आगीचा भडका क्षणात संपूर्ण बसच्या सभोवताल पसरला.

या आगीने संपूर्ण बसला कवेत घेतलं, प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी देखील संधी मिळू शकली नाही. या अपघातात 38 जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde announced 5 lakh rupees to family members of died travellers) यांनी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त केला. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमी रुग्णांच्या उपचाराचा खर्च देखील शासन करणार आहे. जखमी रुग्णांचा जीव वाचावा यासाठी सर्व प्रयत्न करण्याच्या सूचना प्रशासनाला आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

सदर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाशिककडे रवाना झाले आहेत. महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सिव्हिल सर्जन, जिल्हाधिकारी या सर्वांच्या संपर्कात मी आहे आणि मी स्वतः नाशिकला जात आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.