महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरू असताना शिवसेनेतील पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray at Matoshri) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर टीका केली आहे. आई भवानीवर आपला विश्वास असून विजय आपलाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) अशा दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहेत.
दरम्यान, मातोश्रीवर उस्मानाबादहून आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसमोर उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी काही कार्यकर्त्यांना थेट मातोश्रीवर नेऊन शिवबंधन बांधलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपसह केंद्रीय मंत्री अमित शहा, आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
मला धाराशिव जिल्ह्याचं कौतुक वाटतं, कैलासने काय केलं हे सर्वांना माहिती आहे. जालन्यात परिस्थिती तुम्हाला माहित आहे, ज्यांना खस्ता खाऊन तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले. असेही उद्धव ठाकरे म्हणाले आणि अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता त्यांनी खोतकारांवर टीका केली. इतकंच नव्हे तर ईडी कारवायांवरून देखील उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.