TOD Marathi

आशा पारेख यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

संबंधित बातम्या

No Post Found

दिल्ली :

कला विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार हा यंदा अभिनेत्री आशा पारेख (Renowned Actress Asha Parekh to receive Dadasaheb Phalke Award) यांना जाहीर करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur announcement) यांनी याची घोषणा नुकतीच केली आहे. आपल्या दमदार अभिनायाने बॉलीवूडचा काळ गाजवणाऱ्या पारेख यावर्षी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

दोन ऑक्टोंबर 1942 रोजी गुजरात मध्ये त्यांचा जन्म झाला गुजराती कुटुंबातून येणाऱ्या अशा यांच्या आई मुस्लिम तर वडील गुजराती होते. सत्तरच्या दुष्काळ अशापारिक केवळ चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या मानधनामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या. अगदी लहान वयात बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या पारेख यांनी जवळपास 80 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

प्यार किसी से होता है, घराना, भरोसा, मेरे सनम, तीसरी मंजिल, उपकार, शिकार, साजन, आन मिलो सजना हे त्यापैकी काही विशेष गाजलेले चित्रपट सांगता येतील.