TOD Marathi

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा पेच गेले काही दिवस सुटता सुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) या संदर्भात सुनावणी पार पडली. 5 सदस्यीय खंडपीठांसमोर ही सुनावणी पार पडली. आणि निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचा निर्णय घेण्यासाठी मोकळा आहे, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने दिली.

हा शिंदे गटाला (Eknath Shinde) दिलासा मानला जात आहे. यावर घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आपलं काम व्यवस्थित करत आहे, कोणत्या गोष्टीमुळे कुणाला दिलासा मिळतंय अशी परिस्थिती नाही’ या उलट त्या-त्या संस्थांनी त्यांची त्यांची काम बरोबर करणंच अपेक्षित आहे. साधारण महिनाभरात या संदर्भातला अंतिम निकाल हाती येणे अपेक्षित आहे. आजच्या आज यावर निकाल येईल अशी अपेक्षा करणं चूक आहे.