TOD Marathi

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे? या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वच बाजूने जोरदार युक्तिवाद या सुनावणीच्या दरम्यान करण्यात आला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या (Hearing in supreme court on Maharashtra Political Crisis) घटनापीठाच्या पाच न्यायमूर्तींची एकमेकांसोबत चर्चा झाली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला धक्का बसलाय तर शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे अशा स्वरूपाचा बातम्या सगळीकडे होत्या. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला (Election Commission) पुढील कारवाई करण्यास होकार दिला आहे. यावर, शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, (Aditya Thackeray on supreme court decision) आजच्या निर्णय म्हणजे धक्का नाही आणि दिलासाही नाही. प्रकरण सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाकडे गेले आहे. जिथे सुनावणी होईल, तिथे लढायला आम्ही तयार आहोत. आमचा न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा लढा लोकशाहीसाठी, संविधानासाठी आहे आणि आमचा संविधानावर लोकशाहीवर, न्यायदेवतेवर विश्वास आहे. आणि हा संपूर्ण प्रकार संपूर्ण देश बघत आहे, असे ठाकरे म्हणाले.

सुप्रीम कोर्टानंतर आता निवडणूक आयोगासमोर पूर्ण ताकदीने लढू, सत्यासाठी लढत राहू आजचा निर्णय म्हणजे शिवसेनेला धक्का बसला असे त्यांना वाटत असेल तर हा धक्काही नाही आणि दिलासाही नाही. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता तेव्हा ही लोक टेबलावर चढून नाचले होते. त्यांच्याकडून वेगळं काही अपेक्षित देखील नाही. मात्र, आम्ही पुढेही सत्यासाठी लढत राहू, अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली आहे.