TOD Marathi

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक (Andheri East bye election Rutuja Latke to contest) लढणार आहेत. मात्र, निवडणूक लढण्यापूर्वी त्यांना त्यांच्या नोकरीचा राजीनामा देणे आवश्यक आहे. त्यांनी तो राजीनामा मुंबई महापालिकेला दिलाही आहे. मात्र, तो अजून मंजूर झाला नसल्याने ऋतुजा लटके यांच्या निवडणूक निवडणुकीवर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेतली. (Rutuja Latke met BMC Commissioner)

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना आपण मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. माझी आणि मुख्यमंत्र्यांची कुठलीही भेट झाली नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. माझ्याकडे बघितल्यावर तुम्हाला वाटतंय का की माझ्यावर कुठला दबाव आहे? असा प्रश्न देखील ऋतुजा लटके यांनी यावेळी विचारला. आमची निष्ठा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर, ठाकरे परिवारावर आणि उद्धव साहेबांसोबत आहे असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, भाजपचे प्रस्तावित उमेदवार मुरजी पटेल यांनी पक्ष जी भूमिका घेईल ती आपण स्वीकारू असं म्हणत सुचक वक्तव्य केलं आहे. दीपक केसरकर यांनी याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील असं म्हटलं होतं. त्यामुळे आता भाजप ही जागा शिंदे गटाला सोडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप अशी वाटणारी ही निवडणूक आता वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही बाजुंसाठी अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक होणार आहे.