टिओडी मराठी, टोकियो, दि. 4 ऑगस्ट 2021 – टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत मेडल मिळेल, अशी आशा आहे. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या कुस्तीत भारताच्या रविकुमार दहीयाची लढत कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवशी होती. या मॅचमध्ये रवी कुमार विजयी झाला आहे. भारताकडून यापूर्वी सुशील कुमारनं ऑलिम्पिक फायनलमध्ये धडक मारली होती. त्याची बरोबरी रवी कुमारने केलीय.
रवी कुमारने मॅचच्या सुरुवातीला 2-1 अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर सनायेवने जोरदार खेळ करत रवीवर 9-2 ने आघाडी घेतली. त्यानंतर रवीने जोरदार कमबॅक करत ही आघाडी 5-9 ने कमी केली. रवीने त्यानंतर उत्तम खेळ करत 7-9 ने ही आघाडी कमी केली. रवी कुमारने त्यानंतर ही आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.
भारताच्या रविकुमार दहियाने कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरसचा पराभव केला आणि सेमीफायनल गाठली होती. रविकुमारने 57 किलो वजनी गटात हे यश संपादन मिळवलं. त्याने सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली.
दहा गुणांच्या आघाडीमुळे रविकुमारने वेळ संपण्यापूर्वी या कुस्ती सामन्यात विजय मिळवला होता. रवी हरयणाच्या सोनिपत जिल्ह्यामधील आहे.
One of the finest and most dramatic comeback by Ravi Kumar Dahiya!
India is confirmed of another Olympic medal as Ravi is through to the 57kg FINAL in men's #Wrestling
at #Tokyo2020 #Cheer4India 🇮🇳 pic.twitter.com/8dn6VdFKhk— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 4, 2021
😳😲 #RaviKumarDahiya's comeback 'victory by pin' is all the more impressive when you see that his opponent was biting him all along!
👊 #RaviKumar's win is going to go down as one of the most memorable moments of #Tokyo2020 for #TeamIndia!
🥇 Let's #GoForGold! #Cheer4India pic.twitter.com/oe5E20AG78
— Sportwalk Media (@sportwalkmedia) August 4, 2021