TOD Marathi

ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांना ‘Delta Plus’चा अधिक धोका – WHO Chief Tedros Ghebreyesus

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, जिनिव्हा, दि. 28 जून 2021 – करोनाच्या ‘डेल्ट प्लस’च्या विषाणूचा जगातील किमान 85 देशांत प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूमध्ये कमी वेळात अधिक जणांना बाधित करण्याची क्षमता आहे. हा विषाणू ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांच्यात वेगाने पसरतो आहे, ही बाब अधिक चिंता निर्माण करणारी आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेड्रोस घेब्रेयेसुस यांनी म्हंटलं आहे.

तेड्रोस घेब्रेयेसुस म्हणाले, या विषयावर जगाची जी चिंता आहे, तीच चिंता आम्हालाही आहे. हा विषाणू प्रथम भारतात आढळून आलाय, असेही त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना नमूद केलं.

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही देशांनी आपल्या देशातील लोकांच्या वावरावरील निर्बंध काढून टाकलेत. त्यामुळे या नव्या विषाणूंच्या प्रादुर्भावाचा मार्गच प्रशस्त होताना दिसत आहे.

याचा प्रसार आपण योग्य त्या उपाययोजना व निर्बंधांमधून रोखू शकतो. त्याकडे आता आपल्या सर्वांनाच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे, असे त्यांनी म्हंटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेतील कोरोनाच्या तांत्रिक गटाच्या प्रमुख डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटले आहे की, या विषाणूचे वैशिष्ट्य असे की तो ज्या कोणत्या देशात शिरकाव करतो तेथे तो प्रचंड वेगाने पसरत आहे. याच्या प्रादुर्भावाच्या ट्रॅकवर आम्ही आहे, असेही त्यांनी सांगितले.

युरोपामध्ये करोना कमी होत आहे, त्यामुळे तेथे मोठे इन्व्हेंट होताना दिसत आहेत, तीच अधिक चिंतेची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.

डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या, जगातील कोणत्याच देशाची लसीकरणाची प्रक्रिया अजून शंभर टक्‍के पूर्ण झालेली नाही. अनेक देशांत लसीकरणाची टक्‍केवारी चांगली असली तरी अनेकांना अद्याप लसींचा दुसरा डोस मिळालेला नाही.

अशा लोकांत या विषाणूंच्या प्रादुर्भावाची शक्‍यता अधिक असते. कोरोना लसीकरण या नवीन व्हेरियंटला निश्‍चित पायबंद घालेल. निदानपक्षी लसीकरण झालेल्या काही व्यक्‍तींना या विषाणूची बाधा जरी झाली तरी त्यातून त्याच्या जीव जाण्याची शक्‍यता खूपच कमी आहे.

तथापि, या प्रादुर्भावाच्या संबंधात आपल्याला दोन महिन्यांनी विचार करून चालणार नाही. आता या क्षणी या धोक्‍याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे विविध देशांतील नेते जितक्‍या लवकर यावर उपाययोजना सुरू करतील, यावर याचा चांगला किंवा वाईट परिणाम अवलंबून असणार आहे.