TOD Marathi

‘यामुळे’ घटली E -Mail ची लोकप्रियता ; Instant Messaging App कडे अनेकांचा ओढा

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 17 जुलै 2021 – संगणक आणि त्यात होणारे नवे संशोधन तसेच विविध तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचं महत्व अधिक वाढलेल आहे. काही वर्षांपूर्वी ई-मेल पाठवणे किंवा आलेले ई-मेल वाचणे यांची मोठी क्रेझ होती. लोक एकमेकांचे ई-मेल आयडी आवर्जून नोंद करून घेत होते. आता मात्र, इन्स्टंट मॅसेजिंग ॲपमुळे ई-मेल्सची लोकप्रियता घटली आहे. तसेच आता ई-मेल्सचा वापर हळूहळू कमी करत आहेत.

30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांत ई-मेलची लोकप्रियता कमी झाली आहे. त्याऐवजी व्हॉट्सॲप, टेलिग्राफ, गुगल डॉक्स आणि झूम यासारख्या प्लॅटफॉर्मला पसंती दिली जातेय, अशी माहिती डेलॉएट पंपनीच्या सर्व्हेतून दिसले आहे. लोकांना आता ई-मेल पाठवणे कंटाळवाणे वाटत आहे.

वर्ष 2020 मध्ये 46 टक्के कर्मचाऱ्यांनी मान्य केले की त्यांना ई-मेलच्या माध्यमातून कामाच्या वेळी तणाव जाणवतो. म्हणूनच ते अन्य मॅसेंजिंग ॲपकडे वळत आहे.

जगात सुमारे 400 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या कामासाठी ई-मेलचा वापरतात. प्रत्येक व्यक्तीला जेवढे ई-मेल येतात. त्यातील सरासरी 200 ई-मेल तर वाचले जात नाहीत, असे दिसून आले आहे.