टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 11 जून 2021 – पृथ्वीच्या दक्षिणेकडील सागराला जगातील पाचवा महासागर म्हणून नॅशनल जिओग्राफीक या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून मान्यता दिली आहे. जागतिक सागर दिनाच्या औचित्याने ही घोषणा केली आहे. दक्षिण महासागर हे समुद्री पर्यावरणातील एक महत्त्वाचे स्थान व दक्षिण गोलार्धातील प्रमुख केंद्रबिंदू आहे.
अंटार्टिकाला याच महासागराने वेढले आहे. अंटाटूर्ओकाच्या किनारपट्टीपासून या सागराला सुरूवात होते. दक्षिणाकडे 60 अंश अक्षांशांपासून ते ड्रेक पॅसेज आणि स्कॉशिया समुद्र वगळून पृथ्वीवर अस्तित्त्वात असलेल्या इतर ४ महासागरापैकी ऍटलांटिक, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर या तीन महासागरांच्या सीमांना हा महासागर स्पर्श करतो.
त्याभोवती असलेल्या भूभागाऐवजी पाण्यात सध्या असलेले प्रवाह हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या प्रांताच्या उत्तरेकडील भागांपेक्षा या भागातील प्रवाह थंड आणि कमी खारट पाण्याचे आहेत.
अंदाजे 34 दशलक्ष वर्षांहून अधिक जुन्या या प्रवाहामुळे दक्षिण महासागराचे पर्यावरणशास्त्रीय महत्व वेगळे आहे. या महासागरामध्ये हजारो प्रजातींसाठी एक अनन्य अधिवास उपलब्ध करून दिला आहे, असे नॅशनल जिओग्राफिकने म्हटले आहे.