दीदींचा BJP ला धक्का; राष्ट्रीय उपाध्यक्षाचा मुलासह TMC मध्ये प्रवेश

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 11 जून 2021 – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील झाले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसला अनेक धक्के दिले. मात्र, विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर तृणमूल काँग्रेसने आता भाजपला धक्का देण्यास सुरुवात केलीय.

चार वर्षांपूर्वी तृणमूलची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले नेते आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी घरवापसी केली.

मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकूल रॉय यांनी मुलासह घरवापसी केली.

मुकूल रॉय यांच्या पत्नी आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबद्दल मुकूल रॉय यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केला होता. मात्र, त्यानंतरही रॉय यांनी भाजपला टाटा करत तृणमूलमध्ये प्रवेश केला.

Please follow and like us: